Advertisement

मुसळधार पावसामुळं भाजीपाला महागला

शेतीचं नुकसान झाल्यामुळं भाजीपाल्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याशिवाय, आवक ५० टक्क्यांनी घटली आहे.

मुसळधार पावसामुळं भाजीपाला महागला
SHARES

मुंबईसह राज्यभरात मागील काही दिवसांपासून पावसानं (mumbai rains) विश्रांती घेतली असली, तरी, राज्याच्या अनेक भागांच मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसंच, राज्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता भाजीपाला (vegetable) बसला आहे. शेतीचं नुकसान झाल्यामुळं भाजीपाल्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याशिवाय, आवक ५० टक्क्यांनी घटली आहे.

पुढील महिन्यातही दर चढेच राहणार असल्याची माहिती मिळते. नवी मुंबई एपीएमसी मार्केट (navi mumbai apmc market) मध्ये दररोज भाजीपाल्याच्या ७०० ते ७५० गाड्यांची होणारी आवक सध्या ४०० ते ४५० गाड्यांवर आली आहे. आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर दुपटीनं वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये ३० ते ४० रुपयांना मिळणारी भाजी आता ९० ते १५० पर्यंत जाऊन पोहोचली आहे.

नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे भागात पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं ग्राहकांनाही महाग भाजीपाला खावा लागत आहे. महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातही पावसाचा फटका बसल्याने पुढील एक महिना तरी भाजीपाला दर चढेच राहण्याची शक्यता आहे.

  • वांगी - ६० ते ७० रुपये
  • दोडका - ८० ते ९० रुपये
  • कार्ली - १०० ते ११० रुपये
  • शेवगा १२० रुपये
  • कोबी - ७० ते ८० रुपये
  • फ्लॉवर - ११० ते १२० रुपये
  • गाजर - ८० ते ९० रुपये
  • काकडी - ५० ते ६० रुपये
  • वटाणा - १५० ते १७० रुपये
  • टोमॅटो - ५० ते ६० रुपये



हेही वाचा -

NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा