Advertisement

नालेसफाईसाठी रेल्वेला पैसे देऊ नका - राष्ट्रवादीची मागणी


नालेसफाईसाठी रेल्वेला पैसे देऊ नका - राष्ट्रवादीची मागणी
SHARES

रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईचं काम करण्यासाठी प्रशासनाला महापालिकेच्यावतीनं कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी मोठ्या नाल्यांच्या कल्व्हर्टची सफाई करण्यास दिला जात असला तरी त्याची सफाई होत नाही. परंतु ज्यांची सफाई रेल्वेने स्वत: करायला हवी, त्या दोन रुळांमधील पेटीका नाल्यांची सफाईही केली जात नाही. मग हे छोटे नाले साफ कोण करणार असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी यापुढे रेल्वेला नालेसफाईसाठी पैसेच दिले जावू नये अशी मागणी केली आहे.



ऑडीटही नाही

मुंबईतील मध्य व पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील कल्व्हर्टच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी रेल्वे प्रशासनाला देण्याबाबत स्थायी समितीची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव मंजुरीला आला असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी ही मागणी केली. आजवर प्रत्येक वर्षी नालेसफाईच्या कामांसाठी महापालिका, रेल्वे प्रशासनाला निधी उपलब्ध करून देते. परंतू या निधीतून कधीही रेल्वे प्रशासन काम करत नाही. एवढंच काय तर याचा खर्चही देत नाही. आजवर त्यांनी हा खर्च न दिल्यामुळे त्याचं ऑडीटही झालेलं नाही, अशी माहिती त्यांनी दिली. मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी रेल्वेला महापालिका पैसे देते, परंतु दोन रेल्वे रुळांमधून वाहणाऱ्या छोट्या पेटीका नाल्यांच्या सफाईचं काय असा सवाल त्यांनी केला.

शीव व माटुंगा दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी तुंबलं होतं. त्यामुळे पावसापूर्वी ज्या रेल्वेच्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे, त्याची माहिती सदस्यांना दिली जावी,अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. महापालिका जर पैसे देत असेल तर त्यांच्या कामांचा आणि खर्चांचे ऑडीट व्हायला हवं, असंही राजा यांनी म्हटलं आहे. दरम्यान अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी याबाबत रेल्वेकडून माहिती आलेली असून ती सर्व सदस्यांनी दिली जाईल, असं सांगितलं. त्यानंतर हा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केला.



हेही वाचा -

मिशन अकरावी अॅडमिशनला लवकरच सुरुवात

वांद्र्यातील ४९ झाडांना आतून लागली किड


 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा