Advertisement

टोल वसुलीविरोधात राष्ट्रवादीचं मुलुंडमध्ये आंदोलन


टोल वसुलीविरोधात राष्ट्रवादीचं मुलुंडमध्ये आंदोलन
SHARES

'मुंब्रा बायपासचं काम पूर्ण होईपर्यंत ऐरोली आणि मुलुंड इथे होणारी टोलवसुली बंद करा' या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. दुरुस्ती आणि नवीन बांधणीकरता मुंब्रा बायपास ७ मेपासून बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे त्या मार्गावरील वाहनं मुलुंड मार्गे वळवण्यात आली आहेत. यादरम्यान या मार्गावर टोलनाक्यांनी टोल वसुली करू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने मुलुंडमधील आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत.


म्हणून हे काम पुढे ढकललं

याआधी १६ एप्रिलपासूनच मुंब्रा बायपास बंद ठेवण्यात येणार होता. मात्र मुंब्रा बायपास बंद केल्यानंतर जी मोठी वाहतूक कोंडी निर्माण होणार त्याकरता वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जेएनपीटी यांची पुर्व तयारी झाली नसल्याने हे काम पुढे ढकलण्यात आलं होतं.

ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्याचा मार्ग हा मुंब्रा बायपासला पर्यायी मार्ग आहे. मात्र मुंब्रा बायपासच्या कामाने शिळफाटा ते भिवंडी रस्त्यांवरील कल्याण डोंबिवली शहरातून अवजड वाहतूक होणार असल्यानं कल्याण डोंबिवलीकर वाहतूक विभागाच्या या नियोजनावर चांगलेच संतापले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा