Advertisement

'गायीपेक्षा बाईचं दुखणं समजून घ्या...'


'गायीपेक्षा बाईचं दुखणं समजून घ्या...'
SHARES

सरकारने गायीच्या मागे फिरण्यापेक्षा बाईच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोदी सरकारला दिला. महिलांच्या मेकअपच्या वस्तू कररहीत आहेत, मग जी गोष्ट महिलांच्या आरोग्याशी निगडीत आहे, त्या गोष्टीवर मात्र सरकारने कर लावलाय, जो चुकीचा आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, असेही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

सरकारने जीएसटीतून सॅनिटरी नॅपकिन्स वगळले नाहीत, म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना पोस्टाद्वारे सॅनिटरी नॅपकीन्स पाठवले आहेत. तसंच राज्यभरात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जर एवढं सर्व करुनही सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवरचा कर हटवला नाही तर, आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला आहे.

हेही वाचा

'पंतप्रधानांना सॅनिटरी नॅपकिन्स पाठवू'

आजही भारतातील 80 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नाहीत. कारण ते त्यांना परवडत नाहीत. 20 टक्के महिलांना माहीत नसतं की सॅनिटरी नॅपकीन्स कसे वापरावेत. त्यामुळे अशा महिलांना मोठ्या प्रमाणात गर्भाशयाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते. जगात दरवर्षी 27 टक्के महिलांना गर्भाशयाचा कर्करोग होतो आणि त्यातून त्यांचा मृत्यूही होतो. या आकडेवारीत भारतीय महिलांचा टक्का सर्वात जास्त आहे.

हेही वाचा

मासिक पाळी..समज कमी, गैरसमज जास्त!

आपण 'बेटी बचाओ'चे नारे देतो. पण, जेव्हा महिलांच्या आरोग्याचा प्रश्न येतो, तेव्हा हे सरकार काढता पाय घेते. अशा सरकारच्या निषेधार्थ आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. सॅनिटरी पॅड हे आमच्या चैनीची नाही तर, आरोग्यासाठी गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना सॅनिटरी नॅपकिन्स पाठवून आम्ही निषेध व्यक्त करत असल्याचे चित्रा वाघ यांनी या वेळी सांगितले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा