धोक्याची शाळा

मालाड - भिंतींना गेलेले तडे, जागोजागी पडझड, तुटलेल्या खिडक्या. ही दृष्य आहेत मालाडच्या एस. व्ही. रोड परिसरातल्या पालिका शाळेची. याच शाळेच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयातील एक स्लॅब कोसळून शिक्षक स्वप्नील जगताप जखमी झाले होते. मग विचार करा या शाळेत बसणे किती धोकादायक असेल ते?

एक वर्षापासून या शाळेच्या इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव बारगळलाय. पालिकेला अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष चिकणे यांनी केलाय. शाळेची अशी दुरवस्था झाली असली तरी नाईलाजास्तव जीव मुठीत घेऊन विद्यार्थी बसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 

Loading Comments