राणीबागेत येणार पाहुणे प्राणी!

 Rani baugh
राणीबागेत येणार पाहुणे प्राणी!

भायखळा - वीर जिजामाता प्राणी संग्रहालयात लवकरच परदेशातील प्राणी पाहायला मिळणार आहेत. संग्रहालयात जिराफ, झेब्रा, ऑस्ट्रीच, आफ्रिकन अंतेलोपीस, कांगारू, चित्ता, मिरकटस आणि लेमूर्स हे प्राणी आणण्यात येणार आहेत. जिजामाता प्राणी संग्रहालयात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे जिजामाता प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी परदेशी प्राणी उद्यानात आणले जावेत, असा प्रस्ताव केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला पाठवण्यात आला आहे.

या प्रस्तावात भारतातील आणि काही निवडक परदेशातील प्राणी जिजामाता प्राणी संग्रहालयात आणले जाणार आहेत. ज्यामध्ये आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिका या देशातून प्राणी आणण्याचा प्रस्ताव आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने अद्याप या प्रस्तावावर कोणतेही उत्तर दिले नसल्याचं जिजामाता उद्यानाचे अधीक्षक संजय त्रिपाठी यांनी सांगितलं. सध्या राणीबागेत नूतनीकरणाचं काम सुरू असून जिजामाता उद्यानाला संपूर्णपणे जागतिक दर्जाचं बनवण्याचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading Comments