Advertisement

खार रोडवरील नवीन एलिव्हेटेड डेक प्रवाशांसाठी खुला

स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी याची उभारणी करण्यात आली आहे.

खार रोडवरील नवीन एलिव्हेटेड डेक प्रवाशांसाठी खुला
SHARES

खार स्टेशनवरील एलिव्हेटेड डेक खुला करण्यात आला आहे. हा डेक प्लॅटफॉर्म 3 आणि 4 सह नॉर्थ फुट ओव्हर ब्रिजशी जोडण्यात आला आहे. हा एलिव्हेटेड डेक 11.75-मीटर-लांब आणि 10.10-मीटर-रुंद असा आहे. 

स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने याची उभारणी केली आहे. 

खार स्थानकाच्या विकासामुळे वांद्रे स्थानकातील भार कमी होऊ शकतो. कारण पश्चिम रेल्वेने 4.55 कोटी रुपये खर्चून खार स्टेशनला वांद्रा टर्मिनसशी जोडले गेले आहे. थेट 44 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद फूटओव्हर ब्रिज खार आणि वांद्रेला जोडतो. 

"मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लहान स्थानकांची पुनर्रचना करत आहे आणि भविष्यातील वापरासाठी त्यांना अपग्रेड करत आहे. कारण अधिकाधिक प्रवाशांनी त्यांचा वापर करणे अपेक्षित असताना कॉरिडॉरचा विस्तार होणार आहे," असे MRVC प्रवक्त्याने सांगितले.



हेही वाचा

ठाण्यातील 'या' भागांमध्ये रविवारपर्यंत पाणीकपात

माटुंगा: वादग्रस्त पार्किंग टॉवरमुळे रहिवासी पालिकेवर संतप्त

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा