Advertisement

POPच्या घरगुती गणेश मूर्तीवर बंदी घालू नका : आशिष शेलार

येत्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमुर्तीवर बंदी घालण्याचा निर्णय नुकताच मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केला होता.

POPच्या घरगुती गणेश मूर्तीवर बंदी घालू नका : आशिष शेलार
SHARES

मुंबई महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्तीवर बंदी घातली आहे. पण पालिकेच्या या निर्णयाला मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी विरोध केला आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्तीवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. गणेशोत्सव हा मुंबईतील महत्त्वाचा मोठा पारंपरिक उत्सव आहे. यासाठी लागणाऱ्या पीओपी मूर्ती बनवण्याच्या व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून असतात. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नेमण्यात आलेल्या तांत्रिक समितीचा अंतिम अहवाल येत नाही, तोपर्यंत पीओपीच्या मूर्तीवर सरसकट बंदी घालणे अशास्त्रीय, असंविधानिक आणि अयोग्य ठरेल, अशी भूमिका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मांडली आहे. 

येत्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमुर्तीवर बंदी घालण्याचा निर्णय नुकताच मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केला होता. या निर्णयाला मूर्तिकारांकडून विरोध होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघ आणि मुंबईतील मूर्तिकार संघटनेच्या प्रतिनिधींची सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत गुरुवारी बैठक झाली.

आशिष शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवडय़ामध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये गणेशोत्सवाच्या बाबतीत जे निर्णय घेतले त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र पीओपीच्या चार फुटांखालील गणेश मूर्तीवर बंदी घालण्यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नाही.



हेही वाचा

घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बंधनकारक

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी आणि डिपॉझिट फी माफ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा