...या नाल्याची सफाई होणार कधी?

 Dahisar
...या नाल्याची सफाई होणार कधी?
...या नाल्याची सफाई होणार कधी?
...या नाल्याची सफाई होणार कधी?
...या नाल्याची सफाई होणार कधी?
See all

दहिसर - एस व्ही रोडवरील पेट्रोलपंपाजवळ असलेला नाला पूर्णपणे भरलाय. ज्यामुळे इथं राहणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. तक्रारींनंतरही पालिकेकडून याची दखल घेतले जात नाहीये. या नाल्यातलं सांडपाणी दहिसर पूर्वेच्या रावलपाडा-आनंदनगरमधील मोठ्या नाल्यात जातं. तर दहिसर एसव्ही रोड पेट्रोलपंपहून हाय-वेपर्यंत असलेले नालेही कचऱ्यानं भरलेत. या परिसरात राहणारे अमरनाथ झा यांनी यासंदर्भातली तक्रार पालिकेच्या आर उत्तर विभागाकडे केली आहे. मात्र अजूनही नाल्याची सफाई झालेली नाही.

Loading Comments