Advertisement

मुंबईत १५ लाख कोरोनाबाधित रुग्ण? ‘या’ नेत्याने उपस्थित केला मोठा प्रश्न

मुंबईत १५ लाख कोरोनाचे रुग्ण असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्रातील एका नेत्याने केला आहे. यामुळे भीतीचं सावट अधिकच गहिरं होत चालल्याचं दिसून येत आहे.

मुंबईत १५ लाख कोरोनाबाधित रुग्ण? ‘या’ नेत्याने उपस्थित केला मोठा प्रश्न
SHARES

देशातील कोरोनाबाधित (corona positive patient in maharashtra) रुग्णांनी १ लाखांवर मजल गाठली असून महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्याही ३७१३४ वर जाऊन पोहोचली आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. तर एकट्या मुंबईत २२ हजारांहून (corona positive patient in mumbai)अधिक कोरोनाग्रस्त झाले आहेत. अर्थात ही सरकारी आकडेवारी असली, तरी मुंबईत १५ लाख कोरोनाचे रुग्ण असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्रातील एका नेत्याने केला आहे. यामुळे भीतीचं सावट अधिकच गहिरं होत चालल्याचं दिसून येत आहे.

विदारक वास्तव

भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे (bjp mla nitesh rane) सातत्याने राज्य सरकार आणि महापालिका (bmc hide corona patient) कोरोनाग्रस्तांचे खरे आकडे लपवत असल्याचा आरोप करत आहेत. सरकारी, महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर अत्यंत बेपर्वाइने उपचार करण्यात येत असल्याचे, रुग्णालयातील वाॅर्डात कोरोनाग्रस्तांचे मृतदेह तासंतास पडून असल्याचे व्हिडिओ शेअर करून याआधी नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. 

हेही वाचा - कोरोनाचा हाहाकार! दिवसभरात 76 जणांचा मृत्यू, तर 2127 नवे रुग्ण

लपवण्याची गरज काय?

यानंतर आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी महापालिकेच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मुंबईत कोरोनाचे १५ लाख रुग्ण आहेत? हे खरं आहे की खोटं, याची सत्यता कुणी पडताळू शकतं का? पुरावे देऊ शकतं का? गप्प बसण्यातून काहीच निष्पण्ण होणार नाही. कारण मुंबई महापालिकेत ही चर्चा आहे. एक ना एक दिवस हे बाहेर येणारच आहे, तर लपवण्याची गरज काय? असे प्रश्न विचारले आहेत. 

सर्वाधिक रुग्ण

दरम्यान मंगळवारी १९ मे रोजी दिवसभरात २१२७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. सोबतच राज्यात मंगळवारी १२०२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात ९६३९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

सर्वाधिक चाचण्या

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ९३ हजार ९९८ नमुन्यांपैकी २ लाख ५६ हजार ८६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ३७ हजार १३६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ८६ हजार १९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २१ हजार १५० लोकं संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा