Advertisement

कोरोनाचा हाहाकार! दिवसभरात 76 जणांचा मृत्यू, तर 2127 नवे रुग्ण

राज्यात मंगळवारी 1202 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात 9639 रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाचा हाहाकार! दिवसभरात 76 जणांचा मृत्यू, तर 2127 नवे रुग्ण
SHARES

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37 हजार 136 झाली असून मुंबईतही 22 हजारांचा (22,553) आकडा पार केला आहे.  मंगळवारी 19 मे रोजी दिवसभरात 2127 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. सोबतच राज्यात मंगळवारी 1202 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात 9639 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 26 हजार 164 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

सर्वाधिक चाचण्या

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 93 हजार 998 नमुन्यांपैकी 2 लाख 56 हजार 862 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 37 हजार 136 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 86 हजार 192 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 21 हजार 150 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

76 जणांचा मृत्यू

राज्यात 76 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी झाली असून एकूण संख्या 1325 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 43, ठाणे 15, नवीमुंबई 2,  पुण्यात 6, अकोल्यात 3, बुलढाणा 2, नागपूर 2, औरंगाबाद 1, धुळे 1, नाशिक 1 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 50 पुरुष तर 26 महिला आहेत. आज झालेल्या 76 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 30 रुग्ण आहेत तर 39 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 7 जण 40 वर्षांखालील आहे. या 76 रुग्णांपैकी 58 जणांमध्ये ( 76 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

इतकं सर्वेक्षण

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1765 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून सोमवारी एकूण 15 हजार 178 सर्वेक्षण पथकांनी काम केलं असून त्यांनी 63.29 लाख लोकसंख्येचं सर्वेक्षण केलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा