Advertisement

महापालिका रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांसाठी नेमके बेड किती?- नितेश राणे

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिका रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी नेमके किती बेड शिल्लक आहेत, याची महापालिकेने सर्वांना माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.

महापालिका रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांसाठी नेमके बेड किती?- नितेश राणे
SHARES

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णाच्या आरोग्याकडे प्रशासनकडून दुर्लक्ष होत असल्याचे अनेक प्रकारही उघडकीस येत आहेत. याकडे लक्ष वेधताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिका रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी नेमके किती बेड शिल्लक आहेत, याची महापालिकेने सर्वांना माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे. 

महापालिकेच्या सायन तसंच कूपर रुग्णालयात मृतदेह कित्येक तास वाॅर्डातच पडून असल्याचे व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. या मृतदेहांशेजारीच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यावरून सायन रुग्णालयाच्या प्रमुखांना पदावरून बाजूला करण्यात आलं. तर काही रुग्णालयांत एकाच बेडवर दोन रुग्णांवर उपचार होत असल्याचंही दिसून आलं आहे. यासंदर्भातील काही व्हिडिओ राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. 

हेही वाचा - 'या' रुग्णालयात मृतदेहांच्या शेजारीच रुग्णांवर उपचार

एवढ्यावरच न थांबता नितेश राणे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र देखील पाठवलं आहे. या पत्रात ते म्हणतात की, महाराष्ट्रात तसंच मुंबईतही हजाराेंच्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. हे कोरोनाबाधित रुग्णालयांत गेले असता, त्यांना तिथं बेड उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे ही महामारी आटोक्यात येणं कठीण होत आहे. यामुळे मुंबईतील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून संतापाची भावनाही वाढीस लागत आहे.

त्यामुळे मुंबई महापालिकेच्या किती व कोणकोणत्या रुग्णालयात या काेरोना महामारीवर उपचार करण्यासाठी कोणती व कशी व्यवस्था केली जात आहे. या रुग्णालयांत किती बेड उपलब्ध आहेत, हे मुंबईकरांना कळणं अतिशय गरजेचं झालं आहे. त्यामुळे यासंदर्भातील माहिती मुंबईकरांना शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेला केली आहे.  

संबंधित विषय