Advertisement

'या' रुग्णालयात मृतदेहांच्या शेजारीच रुग्णांवर उपचार


'या' रुग्णालयात मृतदेहांच्या शेजारीच रुग्णांवर उपचार
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रुग्णांती काळजी घेणं गरजेचं आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना आता सायन रुग्णालयातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडोओमध्ये रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये मृतदेहांशेजारी रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून, मुंबई महापालिका आणि आरोग्य विभागाच्या कारभारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

नितेश राणे यांनी ट्विट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कोविड-१९ वॉर्डमधला असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये ४ मृतदेह दिसत असून त्याशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे मृतदेह काळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅगमध्ये बांधण्यात आले आहेत. काही मृतदेहांवर कापड आणि ब्लँकेटदेखील टाकण्यात आलं आहे. तसंच, काही डॉक्टर्स पीपीई किट परिधान करुन उपचार करत असल्याचं दिसत आहेत.

'लोकमान्य टिळक पालिका सामान्य रुग्णालयातील हा व्हिडीओ आहे. ६ मे रोजी रुग्णालयात काही कामासाठी गेलेल्या माझ्या एका कार्यकर्त्यानं हा व्हिडीओ चित्रित केला. रुग्णालयात रुग्णांच्या शेजारीच मृतदेह ठेवण्यात आले आहेत. हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे,' असं नितेश राणेंनी ट्विटरवर म्हटलं आहे. त्याशिवाय, हा व्हिडीओ सायन रुग्णालयातलाच असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाते प्रमोद इंगळे यांनी स्पष्ट केलं. तसंच, मृतदेह इतर ठिकाणी ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र शवागारात मृतदेह ठेवण्याला मर्यादा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर रुग्णालयाच्या अधिष्ठातांचं हे स्पष्टीकरण धक्कादायक असल्याचं आहे, असंही राणे यांनी म्हटलं.

'तो व्हिडीओ सायन रुग्णालयातला असल्याची कबुली अधिष्ठात्यांनी दिली आहे. काही जणांचे नातेवाईक मृतदेह नेत नसल्यानं रुग्णालय प्रशासनानं ते वॉर्डमध्ये ठेवल्याचं त्यांनी सांगितलं. या उत्तरानंतर मुंबई महापालिकेकडून आपण काय अपेक्षा करावी? खासगी रुग्णालयं रुग्णांना दाखल करुन घेत नाहीत आणि सरकारी रुग्णालयांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. ही वैद्यकीय आणीबाणी आहे,' असं ट्विट राणेंनी केलं आहे.



हेही वाचा -

१० जूनपर्यंत १०वी व १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणार?

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजारांच्या पुढे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा