पालथ्या घड्यावर पाणी

 Lower Parel
पालथ्या घड्यावर पाणी
पालथ्या घड्यावर पाणी
पालथ्या घड्यावर पाणी
See all

लोअर परळ - सीताराम जाधव मार्गावर असणाऱ्या अनधिकृत स्टॉल्स आणि बांधकामावर पालिकेच्या दक्षिण अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. पण पालिकेच्या कारवाईनंतर अनधिकृत स्टॉल्स आणि फेरीवाल्यांचा पु्न्हा बाजार भरलाय. त्यामुळे प्रवाश्यांनी पालिकेविरुद्ध नाराजी व्यक्त केलीय. नागरिकांच्या तक्रारी नंतर उशिरा का होईना पालिकेच्या जी दक्षिण अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकामांवर हातोड्याचा मारला होता. ती दुकाने आणि स्टॉल्स पुन्हा उभारले कसे जातात? पालिकेची कारवाई ही फक्त दाखविण्या पुरतीच आहे. त्यांना सत्ताधरी पक्ष या अनधिकृत फेरीवाल्यांना पाठबळ देतंय, असा आरोप शाखा क्रमांक 194 मनसेचे उपाध्यक्ष अमोल देसाई यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना केला.

Loading Comments