Advertisement

पेंग्विन दर्शन मोफतच!


पेंग्विन दर्शन मोफतच!
SHARES

भायखळा - वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात मोफत पेंग्विन दर्शन घेण्याची मुभा वाढवण्यात आली आहे. पेंग्विन दर्शनासाठी नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

31 मार्चपर्यंत मुंबईकरांना मोफत पेंग्विनचे दर्शन करता येणार होते. त्यानंतर मात्र पेंग्विन पाहण्यासाठी प्रौढांना 100 रुपये आणि लहान मुलांसाठी 50 रुपये शुल्क मोजावे लागेल असे प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र पेंग्विन पाहण्याची मुंबईकरांची उत्सुकता पाहून तूर्तास हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

पेंग्विन पाहण्यासाठी शुल्क आकारणी केव्हापासून सुरू करावी याबद्दल अजून निर्णय झालेला नाही, असे वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयाचे अधीक्षक संजय त्रिपाठी यांनी सांगितले. तर आतापर्यंत दोन लाखांपेक्षाही अधिक नागरिकांनी पेंग्विन दर्शन घेतले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा