Advertisement

दिलासा! दुधाच्या दरात वाढ नाही

प्लास्टिक पिशव्या उपलब्ध होणार नसल्यानं दूध उत्पादकांनी बाटल्यांमधून दूध विक्री करण्याचा निर्णय घेत दुधाच्या दरात १० ते १५ रूपयांच्या वाढीचा इशारा दिला. पण पर्यावरण मंत्री यांनी कोणत्याही परिस्थितीत दरवाढ होणार नाही असं म्हणत मंगळवारी दूध उत्पादकांची बैठक घेतली.

दिलासा! दुधाच्या दरात वाढ नाही
SHARES

दुधाची विक्री बाटलीत करण्याशिवाय पर्याय नसल्याचं म्हणत दूध उत्पादकांनी दुधाच्या दरात १० ते १५ रूपयांची वाढ करण्याचा इशारा देत ग्राहकांना झटका दिला होता. आता मात्र ही दरवाढ होणार नसल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


मंत्रालयातील बैठकीत तोडगा

 दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आलेली नाही. दुधाच्या पिशव्या रस्त्यावर येणार नाहीत, त्याची योग्य ती विल्हेवाट लागेल याची काळजी दूध उत्पादकांसह सर्वांनी घ्यावी असं म्हणत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दुधाच्या दरात वाढ होणार नसल्याचं मंगळवारी स्पष्ट केलं आहे. दुधाच्या प्रश्नावर मंगळवारी मंत्रालयात दूध उत्पादक आणि कदम यांच्यासह अन्य मंत्री यांच्यात यशस्वी बैठक झाली. या बैठकीत दुधाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला.


प्लास्टिक मॅन्युफॅक्चर्सला नोटीस

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला दुधाच्या पिशव्यांचा पुर्नवापर आणि पिशव्यांच्या विल्हेवाटीचा आराखडा द महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन निर्धारित वेळेत सादर करू शकले नाही. त्यामुळं प्रदुषण नियंत्रण मंडळानं असोसिएशनला उत्पादन बंद करण्यासंबंधी नोटीस बजावली. त्यानुसार असोसिएशनने १५ डिसेंबरपासून दुध डेअऱ्यांना पिशव्यांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मग दूध संकलनाचा प्रश्न एेरणीवर आला.


पिशव्यांची विल्हेवाट लावावी

प्लास्टिक पिशव्या उपलब्ध होणार नसल्यानं दूध उत्पादकांनी बाटल्यांमधून दूध विक्री करण्याचा निर्णय घेत दुधाच्या दरात १० ते १५ रूपयांच्या वाढीचा इशारा दिला. पण पर्यावरण मंत्री यांनी कोणत्याही परिस्थितीत दरवाढ होणार नाही असं म्हणत मंगळवारी दूध उत्पादकांची बैठक घेतली. या बैठकीत दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी नसल्याचं पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र त्याचवेळी दुधाच्या पिशव्या रस्त्यावर, कचऱ्यात फेकल्या जाणार नाहीत आणि त्यांची योग्य ती विल्हेवाट लावली जाईल यावर विशेष लक्ष द्या असं आवाहन करत दुधाच्या प्रश्नावर अखेर तोडगा काढला आहे. 



हेही वाचा - 

आर्थररोड कारागृहातील कसाबची जागा मल्यासाठी रिकामी

सज्ज व्हा! मुंबई-नाशिक लोकल प्रवासासाठी, चाचणी सुरू




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा