के. के. मोदी चाळीत भूकर पाहणी झालीच नाही!

Sewri
के. के. मोदी चाळीत भूकर पाहणी झालीच नाही!
के. के. मोदी चाळीत भूकर पाहणी झालीच नाही!
के. के. मोदी चाळीत भूकर पाहणी झालीच नाही!
See all
मुंबई  -  

तब्बल 19 वर्षांपासून रखडलेल्या शिवडीतील के. के. मोदी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांची आता पुन्हा एकदा म्हाडाकडून फसवणूक झाल्याचा आरोप रहिवाशांकडून होत आहे. या प्रकल्पांतर्गत मोदी चाळीची भूकर पाहणी अर्थात लॅण्ड सर्व्हे बुधवारी म्हाडा आणि पालिकेकडून करण्यात येणार होता. त्यासंबंधीचे पत्रही म्हाडाकडून रहिवाशांना पाठवण्यात आले होते. या भूकर चाचणीकडून रहिवाशांना बऱ्याचशा अपेक्षा होत्या. पण प्रत्यक्षात बुधवारी भूकर चाचणी झालीच नाही. म्हाडाचे अधिकारी आले, त्यांनी जागेची केवळ पाहणी केली आणि रहिवाशांसोबत जुजबी चर्चा करून ते निघून गेल्याची माहिती येथील रहिवासी मनोज सावंत यांनी दिली आहे. म्हाडाच्या या कारभारावर मोदी चाळवासीयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून, म्हाडाकडून आमची अशीच फसवणूक सुरू असल्याने आता रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, असा इशारा मोदी चाळवासीयांनी दिला आहे.


हेही वाचा - 

म्हाडाच्या सुनावणीत मोदी चाळवासीयांच्या पदरी निराशाच

अखेर मोदी चाळीची होणार भूकर पाहणी


एकीकडे बिल्डर 19 वर्षांपासून पुनर्विकास करत नसून, म्हाडा ही जमीन संपादीत करत पुनर्विकास मार्गी लावण्यात रस दाखवत नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. तर दुसरीकडे बिल्डरने या पुनर्विकासासाठी जो आराखडा तयार केला आहे, तो आराखडा नियम धाब्यावर बसवत तयार केल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे. डोंगर पोखरुन इमारती बांधणे या आराखड्यात प्रस्तावित केले आहे, तर अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठी जागाही सोडण्यात आलेली नाही. तर टाटा पॉवरच्या लाईनजवळ असल्याने 30 मीटरची जागा सोडून प्रकल्प राबवणे गरजेचे असतानाही 30 मीटरची जागाही आराखड्यात सोडण्यात आलेली नाही. असे असताना अशा आराखड्याला पालिकेने मंजुरी दिलीच कशी? असा सवाल करत रहिवाशांनी या आराखड्याला आव्हान देत म्हाडा, पालिकेकडे तक्रार केली होती. त्यानुसार म्हाडाने पालिकेच्या अधिकाऱ्यांसह 14 जून रोजी भूकर चाचणी करत सत्यता पडताळू आणि रहिवाशांसोबत चर्चा करू, असे आश्वासन देत त्यासंबंधीचे पत्रही पाठवले होते.


हेही वाचा -

मोदी चाळीला बुरे दिन


त्यानुसार बुधवारी ही भूकर पाहणी होणार असे वाटत असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांचा तर पत्ताच नव्हता, शिवाय बिल्डरही गायब होता. म्हाडाचे अधिकारी कोणतीही कागदपत्रं, आराखडा, नकाशे न घेताच मोदी चाळीत आले आणि ते केवळ रहिवाशांशी चर्चा करुन परतले. याविषयी संबंधित अधिकारी सुहास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केवळ रहिवाशांशी चर्चा झाली असून, रहिवाशांचे म्हणणे वरिष्ठांसमोर ठेऊ, असे सांगितले आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.