Advertisement

भंगारातही कोणी घेईना 'INS विराट'

भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झालेली INS विराट ही विमानवाहू युद्धनौका भंगारातही घेण्यास कोणी तयार नसल्याचं समोर आलं आहे.

भंगारातही कोणी घेईना 'INS विराट'
SHARES

भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झालेली INS विराट ही विमानवाहू युद्धनौका भंगारातही घेण्यास कोणी तयार नसल्याचं समोर आलं आहे. INS विराट भंगारात काढण्यासाठी केलेल्या ई-लिलावात कोणीही खरेदीदार पुढे आलेला नाही. भारतीय नौदलाने INS विराटला भंगारात विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा ई-लिलाव केला होता. मात्र,  ई-लिलावात कोणीही खरेदीदार मिळाला नाही. या ई-लिलावात सहभाग घेण्यासाठी सुरक्षा ठेवीच्या रुपात ५ कोटी ३ लाख रुपये अग्रिम रक्कम जमा करणे अनिवार्य होते. 

या ऐतिहासिक युद्धनौकेला संग्रहालयात परावर्तीत करण्याच्या जुन्या योजनेअंतर्गतही कुणी खरेदीदार मिळाला नव्हता. त्यानंतर या युद्धनौकेचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला.  लिलावात अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्यामुळेच ही नौका भंगारात काढण्यासाठी आॅनलाइन बोली मागवण्यात आली होती. १७ डिसेंबरला ई - लिलाव होता. मात्र, या लिलावात कोणाही बोली लावली नाही. 

'द ग्रँड ओल्ड लेडी' असे बिरूद मिरवणारे हे ऐतिहासिक जहाज दीर्घकाळ भारतीय नौदल आणि रॉयल नेव्हीच्या सेवेत होते. एप्रिल १९८६ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने HMS हार्मिसला ६.३ कोटी डॉलरमध्ये खरेदी करण्यासाठी ब्रिटनसोबत करार केला होता. HMS हार्मिसची डागडुजी आणि नवी उपकरणांची खरेदी केल्यानंतर १९८७ मध्ये ते INS विराटच्या रुपात भारतीय नौसेनेच्या नौकांच्या ताफ्यात दाखल केले गेले. या जहाजाचे नाव जगातील सर्वात दीर्घकाळ सेवा देणारे मोठे जहाज म्हणून गिनीज बुकात नोंद करण्यात आले आहे. 



हेही वाचा  -

शारीरिक संबंधांसाठी बायकोची केली अदलाबदल

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाइल आणण्यास बंदी घालावी, पालक संघटनांची मागणी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा