जोगेश्वरी रेल्वे प्लॅटफॉर्मवरील छत गायब

 Jogeshwari
जोगेश्वरी रेल्वे प्लॅटफॉर्मवरील छत गायब
Jogeshwari, Mumbai  -  

सध्या पावसाळा सुरू आहे. अशातच पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी स्थानकाच्या फलाट क्रमांक एक आणि दोनवरील पत्रेच गायब झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक आणि दोनवर छतच नाही. त्यामुळे अबालवृद्धांना पावसात भिजतच ट्रेनची वाट पहावी लागत आहे. जोरदार पावसात तर, भिजत-भिजत ट्रेनमध्ये चढावे लागते. त्यामुळे फार अडचण होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

मला रोज जोगेश्वरीवरून मरीन लाईन्स येथे कामासाठी जावे लागते. काल लोकलची वाट बघत मी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभा होतो. तेव्हा अचानक पाऊस आला. परंतु प्लॅटफॉर्मवर छत नसल्याने मी पूर्णत: भिजून गेलो.
- साहिल खान, प्रवासी

जोगेश्वरी स्थानकाच्या प्लॅटफाॅर्मवरील छत काढल्यामुळे उन्हाळ्यासोबतच आता पावसाळ्यातही प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तरीही रेल्वे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेतलेली नाही.
- मुकर्रम शेख, प्रवासी

Loading Comments