मुंबईच्या रस्त्यांवर परदेशी नकोत, भारतीय झाडे लावा़ - सभागृहनेते

 CST
मुंबईच्या रस्त्यांवर परदेशी नकोत, भारतीय झाडे लावा़ - सभागृहनेते
CST, Mumbai  -  

शिवसेना पक्षाचे मूळ हे स्थानिक पातळीवरच रुजलेले असल्यामुळे बाहेरच्या कोणत्याही वस्तूला अथवा व्यक्तीला त्यांचा विरोध असतो. आजवर बाहेरुन येणाऱ्या लोकांना विरोध करणाऱ्या शिवसेनेने आता परदेशी झाडे मुंबईत लावण्यास विरोध दर्शवला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर उंबर, वड किंवा जांबूळ अशीच भारतीय मूळ असलेलीच झाडे लावण्यात यावी, अशी चक्क सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केली आहे.

मुंबईतील अनेक रस्त्यांवर सध्या विविध प्रजातींची झाडे लावली जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने परदेशातील झाडांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. परदेशी झाडांना बुरशी लागून त्यावर विविध प्रकारचे किटक, रोग झाडांवर पसरून ती झाडे पोखरली जात आहे. या झाडांमुळे अन्य झाडांनाही किड लागली जात असल्यामुळे परदेशी झाडांची किडच नष्ट करण्याचा प्रयत्न महापालिकेच्यावतीने होत आहे. पर्जन्यवृक्षांसह अनेक झाडांवर सध्या पांढरा मावा पसरून झाडे मरत चालली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सभागृहनेते यशवंत जाधव यांनी वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीपुढे ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी केली आहे. झाडांवर रोगांचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून आवश्यक ती प्रतिबंधतात्मक उपाययोजना केल्यास झाडे वाचतील. अन्यथा जर या झाडांची योग्यरित्या निगा राखणे शक्य होत नसल्यास उंबर, वड किंवा जांभूळ अशाप्रकारची भारतीय मूळ असलेली झाडे लावण्यात यावी. जेणेकरून चिमण्या इत्यादी पक्ष्यांची संख्या वाढेल आणि पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल, असे यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

येथील हवामान आणि येथील माती याच्याशी बाहेरील जातीच्या झाडांना जुळवून घेणे कठीण होत आहे. त्यामुळे त्यांची अधिक निगा राखणे आवश्यक आहे. येथील प्रदुषणामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच विविध प्रकारचे किटक, रोग झाडांवर पसरून ती झाडे पोखरुन काढतात. अशाप्रकारे पोखलेली झाडे तसेच त्यांच्या फांद्या तुटून पडतात. त्यामुळे पादचाऱ्यांच्या जिवीताला धोका निर्माण होतो, असे यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

Loading Comments