Advertisement

मुंबईत पाणीकपात होणार नाही, बीएमसीचे आश्वासन

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी पातळी खालावली आहे. बीएमसीचे हे आश्वासन नागरिकांना दिलासा देईल का?

मुंबईत पाणीकपात होणार नाही, बीएमसीचे आश्वासन
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) आश्वासन दिले आहे की, जलाशयांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध आहे आणि शहरात कोणतीही पाणीकपात केली जाणार नाही.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्याच्या अहवालानंतर बीएमसीने हे आश्वासन दिले आहे. 

मंगळवार, 26 मार्च रोजी अधिकृत निवेदनात, BMC ने नमूद केले की, "जून ते सप्टेंबर 2023 दरम्यान कमी पावसामुळे, जलाशयांमध्ये तुलनेने कमी पाणी उपलब्ध आहे, परंतु शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही."

राज्य सरकारने मुंबईसाठी राखीव कोट्यातून अतिरिक्त पाणीही उपलब्ध करून दिले आहे. महानगराच्या पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक झाली.

धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर महापालिका प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे, असे बीएमसीने म्हटले आहे आणि नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

अहवालांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीपातळी 32.32 टक्क्यांवर आली आहे. हे पाणी दीड ते दोन महिन्यांसाठीच पुरेल. जूनमध्ये पुरेसा पाऊस न झाल्यास जुलैपर्यंत पाणी देण्याचे खडतर आव्हान नागरीकांना पेलावे लागेल, परिणामी पाणीकपात होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

मुंबईतल्या धरणांमध्ये केवळ 2 महिने पुरेल इतका पाणीसाठा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा