Advertisement

ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जलवाहिन्यांची तातडीची दुरुस्ती

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) गुरूवार ७ जानेवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी शटडाऊन घेण्याचं ठरवलं आहे.

ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जलवाहिन्यांची तातडीची दुरुस्ती
SHARES

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी)  गुरूवार ७ जानेवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी शटडाऊन घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा, खारेगांव, पारसिकनगर, आतकोनेश्वर नगर, घोलाईनगर, रेतीबंदर, विटावा, मुंब्रा, दिवा, ‍ शिळ, कौसा, डायघर, देसाई तसेच इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्र.1 या ठिकाणी एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा २४ तास पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे.

जांभूळ जलशुध्दिकरण येथील जलवाहिन्यांची तातडीने देखभाल दुरूस्ती करण्यासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. याशिवाय ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेअंतर्गत श्रीनगर जलकुंभ येथील जलवाहिनीवरील इनलेट एअर व्हॉल्व बदली करणे, विवियाना जलकुंभाच्या इनलेट जलवाहिनीस क्रॉस कनेक्शन करणे, महात्मा फुले नगर येथील मुख्‌य जलवाहिनीवरील पाण्याची गळती काढणे इत्यादी कामे करण्यासाठी शुक्रवारी ८ जानेवारी रोजी सकाळी ९ ते शनिवार सकाळी ९ वाजेपर्यत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे.

त्यामुळे सिध्देश्वर, जॉन्सन, समतानगर, इटर्निटी, जेल परिसर, साकेत, ऋतूपार्क, घोडबंदर रोड, कोठारी कंपाऊंड, इंदिरानगर, लोकमान्यनगर, गांधीनगर, किसननगर, श्रीनगर, वागळे इस्टेट, कळव्याचा काही भाग व मुंब्र्याचा काही भाग इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा २४ तास पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. 



हेही वाचा -

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मध्य रेल्वेच्या स्थानकांत फेब्रुवारीपासून ई-बाईक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा