Advertisement

ठाण्यात 13 आणि 14 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बंद

नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करून योग्यरितीने साठा करून ठेवावा आणि ठाणे महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाण्यात 13 आणि 14 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बंद
SHARES

एम. स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे महानगरपालिकेला (thane municipal corporation) पाणीपुरवठा होतो. मात्र आता देखभाल व दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा काही काळासाठी बंद राहणार आहे.

शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 ते शनिवार 14 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद (water cut) राहणार आहे. ठाणे (thane) महापालिकेकडून शहरात एकवेळ पाणीपुरवठा (water supply) सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोगरीपाडा, वाघबील, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा आदी भागात शुक्रवार 13 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही.

समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, इंटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा (kalwa) आणि मुंब्य्रातील (mumbra) काही भागात शुक्रवार, 13 डिसेंबर, रात्री 9.00 ते शनिवार, 14 डिसेंबर, सकाळी 9.00 वाजेपर्यंत टप्याटप्याने पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नियोजित शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करून योग्यरितीने साठा करून ठेवावा आणि ठाणे महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



हेही वाचा

नवी मुंबई : रस्ते, नाल्याशी संबंधित तक्रारी 'या' नंबरवर करा

सिद्धिविनायक मंदिर 5 दिवस बंद, कारण...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा