Advertisement

बीएमसी मार्शल्सची आता मुंबईतील बेकायदेशीर पार्किंगवर नजर

बीएमसी मार्शल्स बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार आहेत.

बीएमसी मार्शल्सची आता मुंबईतील बेकायदेशीर पार्किंगवर नजर
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी क्लिनअप मार्शलच्या जबाबदारीत आणखीन वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे. 

थुंकणे, कचरा टाकणे, अयोग्य प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि पाळीव प्राण्यांचा मल न उचलणे यासारख्या प्रकारांवर नजर ठेवून होते. फक्त नजरच नाही तर अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी त्यांच्याकडून दंड आकारणी देखील मार्शलद्वारे केली जात होती. आता याच स्वच्छता मार्शल्सवर आतिरिक्त काम सोपवले जाणार आहे. मार्शलना आता शहरातील रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग रोखण्याचे कामही सोपवले जाणार आहे.

नियोजित क्षेत्राबाहेर वाहने पार्किंग केल्याने केवळ वाहतूक कोंडी होत नाही तर पादचाऱ्यांची गैरसोय होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर प्रशासकीय संस्था या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रभाग स्तरावर मार्शल नियुक्त करत आहेत.

३ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘डीप क्लीनिंग’ मोहीम सुरू केली. त्याची सुरुवात एफ उत्तर वॉर्डातील धारावी आणि डी वॉर्डातील मलबार हिलपासून झाली.

या मार्शल्सची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे, ज्यामध्ये मुंबईतील 24 वॉर्डांमध्ये 720 व्यक्ती त्यांच्या आकारमानानुसार आणि लोकसंख्येच्या आधारावर नियोजित तैनात आहेत. तथापि, बेकायदेशीर पार्किंग उल्लंघनासाठी दंड आकारण्यासाठी मार्शलला अधिकृत केले जाणार नाही. महामारीच्या काळात, मार्शलने 2022 पर्यंत 92 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला होता.हेही वाचा

नायरमधे 10 मजली कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा