Advertisement

शाळांनंतर पालिका उद्यानं, गार्डन्स पुन्हा उघडू शकते

महाराष्ट्र सरकारनं ८ जानेवारी रोजी रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत निर्बंध घातली होती.

शाळांनंतर पालिका उद्यानं, गार्डन्स पुन्हा उघडू शकते
(File Image)
SHARES

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी शारीरिक वर्ग पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC) नं शुक्रवार, २१ जानेवारी रोजी सांगितलं की, शहरातील उद्यानं आणि गार्डन पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याची योजना आहे.

शहरात दररोज कोविड-19 प्रकरणांमध्ये घट होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे, पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, येत्या काही दिवसांत त्यांना शहरात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता देण्याबाबत राज्य सरकारच्या नव्या आदेशाची अपेक्षा आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वेगानं वाढ होत होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ८ जानेवारी रोजी रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत सार्वजनिक हालचालींवर अंकुश, थीम पार्क, मोकळ्या जागा, पर्यटन स्थळे बंद करण्यासह अनेक निर्बंध जाहीर केले होते.

प्रशासकिय अधिकाऱ्यानं सांगितलं की, मर्यादित तासांसह उद्यानं, गार्डन, पर्यटन स्थळे पुन्हा उघडणे यासारख्या प्रतिबंधांमध्ये आणखी काही शिथिलता आणू शकतात. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्णयानंतरच घोषणा केली जाईल. याशिवाय रेस्टॉरंट, हॉटेल्सच्या वेळेतही बदल केला जाऊ शकतो.

गुरुवारी, २० जानेवारी रोजी मुंबईत ५,७०८ कोविड-19 प्रकरणे आणि १२ मृत्यूची नोंद झाली.

तत्पूर्वी, १९ जानेवारी रोजी, पालिकेनं मुंबई उच्च न्यायालयाला (एचसी) सांगितलं की, मुंबई तसंच आसपासच्या भागात कोविड-19 ची स्थिती नियंत्रणात आहे. कारण नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणांची दररोजची संख्या १० दिवसांपूर्वी सुमारे २०,००० वरून कमी होऊन मंगळवारी ६,०००-७,००० पर्यंत आली आहे.हेही वाचा

ठरलं! २४ जानेवारीपासून शाळा सुरू, आदित्य ठाकरेंची माहिती

आता मेडिकलमध्येही उपलब्ध होणार कोरोना लस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा