Advertisement

पर्यटकांसाठी सीएसटीसमोर 'दर्शन गॅलरी'!


पर्यटकांसाठी सीएसटीसमोर 'दर्शन गॅलरी'!
SHARES

महापालिका मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस या जागतिक वारसा असलेल्या वास्तू पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे त्यांच्यासाठी महापालिकेच्या वतीने दर्शनी गॅलरी खुली करून दिली आहे.

जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना तसेच छायाचित्रकारांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तसेच महानगरपालिका मुख्यालय व इतर पूरातन वास्तूंचे छाया‍चित्र काढण्यासाठी ही दर्शन गॅलरी उभारण्यात आली आहे. 

या ‘दर्शनी गॅलरी’ चे महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्व‍र यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे आता याठिकाणी बिनधास्त फोटो काढता येणार आहे.

दर्शनी गॅलरीची ही मूळ संकल्पना आदित्य ठाकरे यांची असून, ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी युद्धपातळीवर याचा आराखडा बनवून कंत्राटदाराची नेमणूक केली. त्यानुसार या दर्शनी गॅलरीचे बांधकाम करण्यात आले. 

या दर्शनी गॅलरीचे लोकार्पण झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी हा सेल्फी पॉइंट नसून, ‘दर्शनी गॅलरी’असल्याचे सांगितले. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना पुरातन वास्तूंचे अवलोकन करणे तसेच त्यांची छायाचित्रे काढणे सुलभ व्हावे यासाठी ही ‘दर्शनी गॅलरी’ तयार करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत अल्प कालावधीत महापालिकेने ही ‘दर्शनी गॅलरी’ तयार केल्याने आदीत्य ठाकरे यांनी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतूक केले.

याप्रसंगी पर्यावरण मंत्री रामदास कदम, स्थानिक आमदार राज पुरोहित, उपमहापौर हेमांगी वरळीकर, महापालिका आयुक्त, अजोय मेहता, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, महिला आणि बालकल्याण समिती अध्यक्ष सिंधू मसुरकर, माजी महापौर तथा नगरसेविका श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त महापालिका आयुक्ता (शहर) डॉ. पल्लवी दराडे, उप आयुक्ता (परिमंडळ – १) सुहास करवंदे, ‘ए’विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा