Advertisement

लवकरच परिसरातील स्वच्छ केलेल्या नाल्यांचा ट्रॅक ठेवता येणार

पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मान्सूनपूर्व नाल्याच्या साफसफाईचे काम दोन शिफ्टमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून काम वेळेत पूर्ण होईल.

लवकरच परिसरातील स्वच्छ केलेल्या नाल्यांचा ट्रॅक ठेवता येणार
(File Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नं एक सॉफ्टवेअर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे जिथे नाला साफसफाईशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल.

पालिका संपूर्ण शहरातील नाल्यांच्या सफाईच्या कामात पारदर्शकता आणण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. नागरिक सॉफ्टवेअरच्या मदतीनं त्यांच्या परिसरातील सफाईच्या कामाच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतात. सर्व तपशील सॉफ्टवेअरवर आणि नंतर वेबसाइटवर अपलोड केले जातील.

स्ट्रॉम वॉटर ड्रेन (SWD) विभागाच्या मते, सॉफ्टवेअर विशिष्ट दिवशी काढलेल्या स्लिटचे प्रमाण, डंपिंग साइट्सवर विल्हेवाट लावलेल्या गाळाचे प्रमाण आणि जेथे नाले साफ केले गेले आहेत त्यासंदर्भातील माहिती उपलब्ध करून  देईल.

काढलेला गाळ नेमून दिलेल्या ठिकाणी वाहून नेला जातो आणि टाकला जातो याचीही माहिती देण्यात येईल. गाळ ज्या ठिकाणाहून उचलला जातो तिथून ते जिथे तो टाकला जातो तिथपर्यंतचा मागोवा नागरिकांना घेता येणार आहे.

आतापर्यंत, सुमारे १५ टक्के नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आहे, असं एसडब्ल्यूडी विभागातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं. मानक पद्धतीनुसार, नाला साफसफाईचे मान्सूनपूर्व काम ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

त्यामुळे, त्याची अंतिम मुदत पूर्ण करण्यासाठी, पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मान्सूनपूर्व नाल्याच्या साफसफाईचे काम दोन शिफ्टमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून काम वेळेत पूर्ण होईल.



हेही वाचा

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होऊ शकते? उद्धव ठाकरे म्हणाले...

मुंबई पोलीस सतर्क, दंगल झाल्यास पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा