मुंबई पोलीस सतर्क, दंगल झाल्यास पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे.

मुंबई पोलीस सतर्क, दंगल झाल्यास पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचणार
SHARES

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस (Mumbai Police) अधिक सतर्क झाली आहे. शहरात कोठेही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस पाच मिनिटात पोहचणार असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

तसंच यासाठी एसआरपीएफचे ५७ पथकं मुंबईत तैनात करण्यात आली आहे. तर मुंबईत ६ दंगल नियंत्रण पथकं तैनात ठेवण्यात आली आहेत.

शहरातील ९४ पोलीस स्थानकात १५०४ पॉइंट्स बनवण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस स्थानकात ४ बीट चौकी असते. या बीटमध्ये ४ पॉईंट्स ठरवण्यात आले आहे. A,B,C,D याचा अर्थ असा की, प्रत्येक पोलीस स्थानकात १६ पॉइंट्स असणार आहे. २४ तास पेट्रोलिंग केले जाणार आहे.

मुंबई पोलीसांकडे सध्या कोणताही अनुचित प्रकार घडल्यास घटनास्थळी तातडीनं पोहचण्याची क्षमता असणारी ३३ पथकं आहेत. १५ पथकं ही लॉ अॅन्ज ऑर्डरचं पालन करण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. यामध्ये लोकल आर्म्स डिव्हीजन पोलिसांचा देखील समवेश करण्यात आला आहे.

प्रत्येक पथकात Riot control police ची ६ पथकं तयार करण्यात आली आहे. RCP च्या प्रत्येक पथकात १४ जण आहेत. तसंच डेल्टा टीम देखील तयर करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस स्थानकात दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहे.

शिवाय, अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा या जोडप्याने - हनुमान जयंतीला ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या नेत्यांनी या जोडप्याला शिवसैनिकांकडून चोख प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा दिला आहे. 

शुक्रवारी, २२ एप्रिल रोजी हे जोडपे मुंबईत आले असताना, मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि ज्येष्ठ सेनेचे नेते जसे की पक्षाचे सचिव आणि खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई मातोश्री निवासस्थानाबाहेर जमले.



हेही वाचा

सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंसह ११५ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबईत ७२ टक्के मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज कमी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा