सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंसह ११५ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई सत्र न्यायालयानं शुक्रवारी सदावर्तेंसह ११५ कर्मचाऱ्यांना दिलासा दिला.

सिल्व्हर ओक हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंसह ११५ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावरील हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंसह ११५ एसटी कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी करताना सदावर्तेंसह ११५ कर्मचाऱ्यांना दिलासा दिला.

जामीनासाठी गुणरत्न सदावर्ते यांना अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालायानं हा निर्णय दिला आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर कोल्हापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मुंबई पोलिसांकडून त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

तत्पुर्वी मुंबई सत्र न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांच्यासह इतर ११५ एसटी कर्मचाऱ्यांना आता जामीन मंजूर झाला आहे. ते कोल्हापूर पोलिसांच्या कोठडीत आहेत त्यामुळे जामीन मिळाल्यानंतरही त्यांची अजून तरी मुक्तता झालेली नाही.

मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल कोल्हापूरच्या शाहुपुरीत गुन्हा दाखल आहे. तत्पुर्वी अकोट पोलिसांनीही सदावर्तेंचा ताबा मागितला आहे. यात त्यांनी २२ एप्रिलला सुनावणी असल्यानं त्यांचा ताबा आवश्यक असल्याची विनंती मुंबई गिरगाव न्यायालयाकडे केली आहे.

सदावर्तेंच्या घराच्या छतावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात तिथे बैठक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याआधी ही बैठक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तपास सुरू आहे.

सदावर्ते यांना मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सदावर्ते यांच्याविरोधात दोन समाजात तेढ निर्माण होईल, एकोप्याला बाधा येईल अशी कृती केल्याप्रकरणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल त्यांच्यावर कलम 153 (अ) नुसार गुन्हा दाखल आहे.



हेही वाचा

मुंबईत ७२ टक्के मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज कमी

मुंबई पोलिसांकडून दुचाकी चालकांसाठी नवीन नियमावली जाहीर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा