मुंबई पोलिसांकडून दुचाकी चालकांसाठी नवीन नियमावली जाहीर

दुचाकी स्वारांच्या अपघाताच्या घटना कमी करण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे.

मुंबई पोलिसांकडून दुचाकी चालकांसाठी नवीन नियमावली जाहीर
(File Image)
SHARES

मुंबईतील रस्त्यावर वाढत्या दुर्घटना कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, हेल्मेट नसलेल्या चालकांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुरुवारी, ७ एप्रिल रोजी दुचाकी वाहनचालकांसाठी नवीन नियमावली काढली आहे.

  • हेल्मेट नियमाचं उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वाराला प्रथम ई-चलन जारी केलं जाईल.
  • त्यानंतर त्यांचा ड्रायव्हरचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) तपशील पाठवला जाईल.
  • त्यानंतर, जवळच्या वाहतूक चौकीत दोन तासांच्या वाहतूक जनजागृती मोहिमेसाठी पाठवले जाईल आणि अशा कृतीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
  • बहुतांश अपघातांमध्ये महाविद्यालये आणि शाळांमधील तरुण पिढीचा समावेश असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीस लवकरच संपूर्ण शहरात व्हिडिओ, व्याख्याने आणि मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

अहवालानुसार, योजना सुरू आहे आणि DCP रौशन यांनी शाळा/कॉलेज अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, विद्यार्थ्यांना जागृत बनवण्यासाठी आणि त्यांना वाहतूक नियमांची जाणीव ठेवण्यासाठी या उपक्रमात वाहतूक पोलिसांना पाठिंबा द्यावा.

मुंबई पोलिसांच्या पृष्ठावर सामायिक केलेल्या YouTube व्हिडिओमध्ये, पोलिस उपायुक्त (वाहतूक मुख्यालय) राज टिळक रौशन यांनी सांगितलं की, नियमांचं उल्लंघन करणार्‍याला त्याचा धडा शिकता येईल याची खात्री करण्यासाठी आवश्यक SOP लागू करण्यात आली आहे.

गेल्या एका महिन्यात, आम्ही ७५,००० हून अधिक दुचाकीस्वारांना हेल्मेटशिवाय वाहन चालवल्याबद्दल दंड ठोठावला आहे, असंही ते म्हणाले.हेही वाचा

मुंबई ते गुजरात "या" ट्रेनमध्ये व्हिस्टाडोम कोच सुरू

एसटी कर्मचाऱ्यांना 'या' तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे हायकोर्टाचे आदेश

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा