नाल्याच्या गाळामुळे नागरिक त्रस्त

 Girgaon
नाल्याच्या गाळामुळे नागरिक त्रस्त
नाल्याच्या गाळामुळे नागरिक त्रस्त
See all

गिरगांव - नाल्यातून काढलेला गाळ आणि कचऱ्यामुळे कुंभारवाड्यातील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. पालिकेची गाडी सकाळी पडलेला कचरा उचलण्यासाठी रात्री येते. तर कधी कधी तो कचरा उचललाही जात नाही. मागील अनेक महिन्यांपासून हीच स्थिती आहे. तसंच त्या नाल्याच्या वाहत्या पाण्याचाही नागरिकांना सामना करावा लागत आहे. 'या कचऱ्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे', 'यासंदर्भात तक्रार करूनही पालिका याकडे लक्ष देत नाही', असं दुकानदार जगतपाल चौरसिया यांनी सांगितलं. तर याबाबत पालिका सी विभाग (घन कचरा व्यवस्थापन) अधिकारी दिव्या जाधव यांना विचारले असता 'परिसराची पाहणी करून रहिवाशांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवू' अस त्यांनी सांगितलं

Loading Comments