'मुंबई लाइव्ह'च्या दणक्यानंतर नालेसफाईला सुरुवात

 Chembur
'मुंबई लाइव्ह'च्या दणक्यानंतर नालेसफाईला सुरुवात

चेंबूरच्या तीन तलाव ते स्वामी विवेकानंद महाविद्यालय दरम्यान वाहणारा नाला सफाई अभावी पूर्णपणे तुंबला होता. गेल्या वर्षभरात या नाल्याची सफाई न झाल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. याचा त्रास या नाल्यालगत राहणाऱ्या साठे नगर आणि कोकण नगरातील राहिवाशांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत होता. याबाबत 'मुंबई लाइव्ह'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेने तत्काळ या नाल्याच्या सफाईला सुरुवात केली आहे. गुरुवारपासून ही सफाई या ठिकाणी सुरू झाली असून येत्या चार दिवसांत संपूर्ण नाल्याची सफाई पूर्ण होणार असल्याची माहिती कंत्राटदार एम. आनंद यांनी दिली आहे.

Loading Comments