Coronavirus : मुंबईत २४ तासात कोरोनाचे १०६ नवे रुग्ण

महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या १ हजार १३५ वर पोहोचली आहे. यामध्ये महाराष्ट्रात अधिक रुग्ण सापडत आहेत.

Coronavirus : मुंबईत २४ तासात कोरोनाचे १०६ नवे रुग्ण
SHARES

८ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या १ हजार १३५ वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, बुधवारी महाराष्ट्रात ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी राज्यात ७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या आकड्यामुळे धोका अधिक वाढला आहे. मुंबईत बुधवारी १०६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील रुग्णांचा आकडा ७१४ वर गेला आहे. त्यामुळे सोमवारी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)नं मुंबईतील काही ठिकाणं सील केली आहेत. महानगरपालिकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालाच्या आधारे शहरातील सर्वात जास्त रुग्ण वरळी आणि प्रभादेवी भागात आढळून आली आहे. याशिवाय धारावी, अंधेरी आणि ग्रँट रोड यासारख्या ठिकाणांचाही या यादीत समावेश आहे.

बुधवारी पालिका अधिकाऱ्यांना मुंबईच्या एल-वॉर्ड म्हणजे कुला इथं एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. मुंबई पालिकेनं पोलिसांच्या मदतीनं हा परिसर सील केला आहे. त्या परिसरातील सर्व विक्रेत्यांना आपला व्यवसाय बंद करण्यास सांगितलं आहे. सील केलेल्या भागातील रहिवाशांना बाहेर जाण्यास आणि बाहेरून कोणाला आत येण्यास मनाई आहे. या रहिवाशांना आवश्यक त्या वस्तू पुरवण्यात येत आहेत.

महापालिकेच्या आयुक्तांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात म्हटलं आहे की, मुंबईत मास्क घालणं बंधनकारक आहे. तुम्ही कुठल्याही कारणास्तव बाहेर पडा पण तुम्ही मास्क घालणं आवश्यक असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. जर मास्क नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

 • मुंबई ७१४
 • कल्याण-डोंबिवली २६
 • नवी मुंबई २९
 • ठाणे २७
 • वसई-विरार १०
 • उल्हासनगर १
 • पनवेल ६
 • पुणे १६६
 • पिंपरी १७
 • पुणे (ग्रामीण) ६
 • नागपूर १
 • अहमदनगर २५
 • रत्नागिरी ३
 • औरंगाबाद १३
 • यवतमाळ ३
 • सांगली २६
 • सातारा ६
 • उस्मानाबाद ४
 • कोल्हापूर २
 • जळगाव २
 • बुलडाणा ८
 • गोंदिया १
 • नाशिक २
 • पालघर ३
 • वाशिम १
 • अमरावती १
 • लातूर ८
 • हिंगोली १
 • जालना १
 • मीरा-भाईंदर ३
 • अकोला १

दरम्यान पंतप्रधान मोदींनी आज सर्वपक्षीय नेत्यांबरोबर बैठक घेतली आणि त्यात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले. कोरोनाव्हायरसच्या (Covid -19) प्रकरणात वाढ होत असताना देशाच्या सर्व भागांतून १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन उठवणे शक्य होणार नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ते राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करतील पण लॉकडाऊन लवकरच संपेल अशी शक्यता दिसत नाही. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवावा लागेल.हेही वाचा

कोरोनाची ब्लड टेस्ट शक्य, ३० मिनिटांत कळणार निकाल

भारतीय कंपनीकडून कोरोनाची अँटीबॉडी किट तयार

संबंधित विषय