Advertisement

कोरोनाची ब्लड टेस्ट शक्य, ३० मिनिटांत कळणार निकाल

आयसीएमआरनं (ICMR) आता रॅपिड अँटीबॉडी ब्लड टेस्टसाठी दिशा-निर्देश जारी केलं आहेत.

कोरोनाची ब्लड टेस्ट शक्य, ३० मिनिटांत कळणार निकाल
SHARES

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदनं (आयसीएमआर) कोव्हिड-19 शी लढण्यासाठी वेगानं पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. आयसीएमआरनं (ICMR) आता रॅपिड अँटीबॉडी ब्लड टेस्टसाठी दिशा-निर्देश जारी केलं आहेत. या संदर्भात अमर उजालानं वृत्त दिलं आहे.

परिषदचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांनी सरकारला पत्र लिहून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना ही चाचणी लवकरात लवकर सुरू करण्यास सांगितलं आहे. या चाचणीमुळे १५ ते ३० मिनिटात परिणाम समोर येतील.

ज्या क्षेत्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे, तेथे आरोग्य विभाग विशेष लक्ष देईल. संक्रमण दर वाढला तर याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि विशेष अधिकाऱ्याला द्यावी लागली.

रक्ताच्या एका थेंबाद्वारे ही तपासणी शक्य आहे. या चाचणीद्वारे समजेल की व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही. हे किट सध्या आयसीएमआरद्वारे निश्चित चाचणी केंद्रावरच मिळेल.



हेही वाचा

Coronavirus Update: कोरोनाची माहिती एका क्लिकवर, सरकारने सुरू केली ‘महाइन्फोकोरोना’ वेबसाईट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा