Advertisement

coronavirus update: कोरोनाची माहिती एका क्लिकवर, सरकारने सुरू केली ‘महाइन्फोकोरोना’ वेबसाईट

राज्य सरकारने कोरोना या विषयाला वाहिलेली स्वतंत्र वेबसाईट (website) सुरू केली आहे. ‘महाइन्फो कोरोना’ (mahainfocorona) असं या वेबसाईटचं नाव आहे.

coronavirus update: कोरोनाची माहिती एका क्लिकवर, सरकारने सुरू केली ‘महाइन्फोकोरोना’ वेबसाईट
SHARES

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (coronavirus) संसर्ग वाढत असल्याने आता ठिकठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. कोरोनाचं संक्रमण वाढू नये म्हणून देशभरात लाॅकडाऊन (lockdown) देखील करण्यात आला आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांना कुठल्याही प्रकारची मदत किंवा माहिती हवी असल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारने कोरोना या विषयाला वाहिलेली स्वतंत्र वेबसाईट (website) सुरू केली आहे. ‘महाइन्फो कोरोना’ (mahainfocorona) असं या वेबसाईटचं नाव आहे.  

एका क्लिकवर

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजनांच्या माहितीसाठी http://mahainfocorona.in नावाची नवी वेबसाईट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढाकारातून साकारण्यात आली आहे. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची एकत्रित, अधिकृत व खात्रीशीर माहिती यामुळे एका क्लिकवर मिळणार आहे. 

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचला कोरोना, मातोश्री परिसर सील

सर्वसामान्यांची दिशाभूल

कोरोनाच्या बाबतीत असंख्य बातम्या सध्या सोशल मीडियात (social media) व्हायरल होत आहेत. त्यात खरं काय खोटं काय? याची पडताळणी करण्याची सोय नसल्याने सर्वसामान्य अनावधानाने खोट्या बातम्यांच्या जाळ्यातही अडकत आहेत. काहींची दिशाभूल होत आहे. नव्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कोरोनाच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. याचसोबत अनेकांपर्यंत सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती व्यवस्थितपणे पोहचू शकत नाही, असे व्यक्ती देखील या वेबसाईटवर येऊन हवी ती माहिती घेऊ शकतील. 

हेही  वाचा - घराबाहेर पडताना मास्क लावाच; पण छत्रीसारखं नको, मुख्यमंत्र्यांच्या जनतेला सूचना

खात्रीशीर माहिती

या वेबसाईटवर महाराष्ट्रातील कोरानाबाधितांची सद्यस्थिती, कोरोनाबाधितांवर करण्यात येणारे उपचार, लाॅकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या जनतेसाठी सरकारकडून पुरवण्यात येणाऱ्या सोई-सुविधा, विविध खात्यांचे मंत्री, पालकमंत्र्यांकडून देण्यात येणारे संदेश अशी इत्थंभूत माहिती या वेबसाईटवर मिळेल.  


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा