
मुंबईत कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पण दिलासादायक म्हणजे रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. याशिवाय पालिकेनं शेअर केलेल्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, कन्टेंमेंट झोनमध्ये सापडणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.
२३ ऑगस्टपर्यंत शहरातील सुमारे १.२५ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ४५ लाख लोक कन्टेंमेट झोन आणि सीलबंद इमारतींमध्ये राहत होते. प्रशासकिय अधिकाऱ्यांनुसार, जून महिन्यात सुमारे ५० लाख नागरिक कन्टेंमेंट झोन आणि सीलबंद इमारतींमध्ये होते.
हेही वाचा : १६ रुग्णालयांवर केडीएमसीची कारवाई, कोरोना रुग्णांकडून अधिक बिल आकारलं
सध्या, आर उत्तर (दहिसर) प्रभागात सर्वाधिक म्हणजेच ६४ कन्टेंमेंट झोन आहेत. त्यानंतर एल (कुर्ला) वॉर्डात ६० कन्टेंमेंट झोन आणि एस (भांडुप) वॉर्ड ५६ झोन आहेत.
याशिवाय, झोपडपट्टीमध्ये कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये हळूहळू घट झाल्यामुळे, संख्या खूपच खाली गेली आहे. दरम्यान, प्रशासनानं आपल्या कन्टेंमेंट झोनची संख्या ६०४ पर्यंत वाढवली आहे. तर ५ हजार ८३४ हून अधिक इमारती आणि चाळी सीलबंद केल्या आहेत. सुरुवातीला झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना रुग्ण अधिक सापडत होते. पण आता पालिकेनुसार गहनिर्माण संस्थांमध्ये रुग्ण सापडत आहेत.
२४ ऑगस्ट रोजी, शहरात कोरोनव्हायरसचे ७४३ नवे आणि २० मृत्यूची नोंद झाली. COVID 19 रुग्णांची संख्या आता १ लाख ३७ हजार ०९१ रुग्ण आहेत. त्यापैकी १८ हजार २६३ सध्या सक्रिय आहेत.
हेही वाचा
