Advertisement

ओला-उबर टॅक्सीचालक शनिवारपासून पुन्हा संपावर

रकारी पातळीवरील चर्चा अयशस्वी ठरल्याने संपाचा निर्णय कायम आहे. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे १७ नोव्हेंबरपासून संप पुकारला जाईल. त्याचप्रमाणे १९ नोव्हेंबरला मंत्रालयावरही मोर्चा काढणार आहे, असं मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं.

ओला-उबर टॅक्सीचालक शनिवारपासून पुन्हा संपावर
SHARES

दिवाळीपूर्वी सलग १२ दिवस संपावर गेलेल्या ओला, उबर टॅक्सीचालक-मालकांनी पुन्हा एकदा संपाचं शस्त्र उचललं आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी झालेली चर्चा अपयशी ठरल्याने टॅक्सीचालक-मालकांनी येत्या शनिवारपासून पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.


मंत्रालयावर धडक मोर्चा

यासंदर्भात 'सरकारी पातळीवरील चर्चा अयशस्वी ठरल्याने संपाचा निर्णय कायम आहे. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे १७ नोव्हेंबरपासून संप पुकारला जाईल. त्याचप्रमाणे १९ नोव्हेंबरला मंत्रालयावरही मोर्चा काढणार आहे', असं मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं.


बैठक अयशस्वी

ऑनलाइन टॅक्सीचं कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये तर प्रति किलोमीटर दर १८ ते २३ रुपये असायला हवं. कंपनीने नवीन वाहने बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावं, अशा विविध मागण्या ओला-उबर चालक-मालकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यासाठी २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारण्यात आला होता.

परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसोबत ओला, उबर चालक संघटनेची बैठक पार पडल्यानंतर १२ दिवसांनंतर संप तात्पुरता स्थगित करण्यात आला. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी मागण्यांवर अंतिम चर्चा करण्याचं स्पष्ट करण्यात आलं. परंतु मागण्यांवर काहीच तोडगा न निघाल्याने १७ नोव्हेंबरपासून ओला, उबर चालक संप करणार असल्याचं मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं.



हेही वाचा-

आता काळी-पिवळी टॅक्सी चालकही आक्रमक

मागण्या मान्य न झाल्यास मातोश्रीवर मोर्चा: ओला, उबर चालक-मालकांचा इशारा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा