जुनं झाड पडून दर्ग्याचं नुकसान

 Pali Hill
जुनं झाड पडून दर्ग्याचं नुकसान
जुनं झाड पडून दर्ग्याचं नुकसान
जुनं झाड पडून दर्ग्याचं नुकसान
जुनं झाड पडून दर्ग्याचं नुकसान
जुनं झाड पडून दर्ग्याचं नुकसान
See all

वांद्रे - वांद्रे पश्चिम परिसरात 150 वर्ष जुनं झाड पडून हजरात निजामुद्दीन शाह कादरी दर्ग्याचं नुकसान झालंय. वांद्र्यातील कोकणी कब्रस्थानमधील नौपाडा कोकणी मस्जिद सांताक्रूझ गोळीबार दर्गा ट्रस्टच्या वतीनं एक महिन्यापासून माती काढण्याचं काम सुरू आहे. ही माती जेसीबी मशिननं काढताना त्याच परिसरात १५० वर्षांपासून असलेल्या झाडाला धक्का लागला आणि दर्ग्याचं नुकसान झालंय. दरम्यान हे लोक साफसफाईच्या नावाखाली माती काढून विकत असल्याचा आरोप आसिफ खान यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना केला. दरम्यान पालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार दाखल करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी दिली.

Loading Comments