Advertisement

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटली


मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटली
SHARES

मुंबईत जरी मागील अनेक दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला. तरी आकडेवारीतील सरासरीनुसार मुंबईत कोरोना बाधितांची संख्या ही कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या मुंबईत ६६ हजारहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्येत वाढ झालेली नाही. 

रुग्णांची संख्या झाली कमी

पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार ७ जून रोजी कोरोनाचे १४२१ रुग्ण समोर आले होते. तर २० जून रोजी फक्त ११९७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे मागच्या १३ दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सरासरीनुसार ११०० ते १३०० दरम्यान कोरोना बाधितांची संख्या आहे. या आकडेवारीनुसार मुंबईत कोरोनावर नियंत्रणात यश मिळवण्यात यश आले असल्याचे निदर्शनास येते. हे सत्र असेच सुरू राहिले तर येणाऱ्या दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संथ्या निश्चितच कमी होईल अशा पालिकेला विश्वास आहे. 

देशात सर्वाधिक कोरोना चाचणी करण्यात मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तामिळनाडूत दहा लाख नागरिकांच्या मागे सर्वाधिक २४ हजार ७९९ कोरोना चाचणी होत आहे. तर मुंबईत १० लाख लोखसंख्ये मागे २१ हजार ७६६ कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण आहे.  त्यातच आता घरोघरी जाऊन कोरोना चाचणी केली जाणार असल्याने निश्चितच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येऊ शकते. असा विश्वास पालिकेला आहे. 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा