Advertisement

शिवशाही बसचा भीषण अपघात, 1 ठार 22 जण जखमी

MH 09 EM 9282 या पनवेल-महाड बसला दुपारी साडे तीनच्या सुमारास अपघात झाला.

शिवशाही बसचा भीषण अपघात, 1 ठार 22 जण जखमी
SHARES

नवी मुंबईत एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण अपघात (accident of Shivshahi bus) झाला आहे. या अपघातात बस मधील एक प्रवाशाचा मृत्यू झाला. तर, 22 प्रवासी जखमी झाले आहेत. 

मुंबई गोवा हायवेवर नवी मुंबईच्या हद्दीत येणाऱ्या कर्नाळा खिंडीत शिवशाहीची ही बस अपघात ग्रस्त झाली आहे. MH 09 EM 9282 या पनवेल-महाड बसला दुपारी साडे तीनच्या सुमारास अपघात झाला.

पनवेलकडून ही बस महाडच्या दिशेने निघाली होती. यावेळी बस चालक ओव्हर स्पीडमध्ये बस चालवत होता. यावेळी अति वेगात असलेली बस ड्रायव्हरला कंट्रोल करता आली नाही. कर्नाळा खिंडीत बस अनियंत्रीत होऊन रस्त्यावर पलटी झाली. बसमधून 38  प्रवासी प्रवास करत होते. 

कर्नाळा खिंडीत बस पोचली असता टर्निंगला ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस थेट रस्ता सोडून खाली नाल्यात जावून आदळली. यामुळे बसने पल्टी खाल्याने  प्रवाशांना जबरदस्त दुखापत झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसमधील 22 प्रवासी जखमी झाले आहेत.

तर, एका प्रवाशाचा या अपघातात मृत्यू झाला आहे.  जखमींना  पनवेल उप जिल्हा रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा