Advertisement

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) एका टोयोटा क्वालिस कारला भीषण अपघात झाला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, एकाचा मृत्यू
SHARES

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) एका टोयोटा क्वालिस कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे दोघेही अंधेरी मुंबई येथील राहणारे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. टोयाटो क्वालिस कारही पुण्याहून मुंबईकडे येत होती. एक्स्प्रेस वेवर लेन कटिंग करून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनानं डाव्या बाजूला जोरात धडक दिली. त्यामुळे क्वालिस कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि भरधाव कार पुढे जाणाऱ्या कंटेनरवर आदळली.

या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक जण जखमी झाला आहे. राहुल दणाणे (वय ३० ) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर सिद्धेश पाटील हा जखमी झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे दोघेही अंधेरी मुंबई इथं राहणारे आहेत. किलोमीटर १६/५०० इथं हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आयबी पेट्रोलिंग अपघातग्रस्तांच्या मदतीला या संस्थेचे पथक घटनास्थळावर दाखल होत त्यांनी मदत कार्य सुरू केले.

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मयत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चौक येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन महामार्ग वरून बाजूला हटवल्यानं वाहतूक कोंडी सुरळीत झाली आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे अपघातास कारणीभूत असलेल्या इतर वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.



हेही वाचा

मुंबईकरांवर इंधनदरवाढीसोबतच टॅक्सी, रिक्षाच्या भाडेवाढीचं संकट

विलगीकरणातील चार प्रवासी हॉटेलमधून पळाले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा