Advertisement

कांदा पुन्हा रडवणार! महाराष्ट्रात महिनाभरात भाव वाढणार

दसरा-दिवाळीपर्यंत किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचा भाव 35 ते 40 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

कांदा पुन्हा रडवणार! महाराष्ट्रात महिनाभरात भाव वाढणार
SHARES

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर स्थिर असून मागणीत वाढ झाल्याने महिनाभरात कांद्याचे दर वाढण्याची चिन्हे आहेत. दसरा-दिवाळीपर्यंत किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचा भाव 35 ते 40 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

सध्या किरकोळ बाजारात 1 किलो कांद्याचा भाव ग्रेडनुसार 20 ते 30 रुपये किलो आहे. महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिण आणि उत्तर भारतातून मागणी आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटकात नव्याने काढणी झालेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात कांद्याचे नवीन पीक नोव्हेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये कांद्याची लागवड चांगली आहे. तथापि, प्रतवारीचा विचार केल्यास, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कांद्याची गुणवत्ता चांगली आहे. दसरा-दिवाळीच्या काळात कांद्याची मागणी वाढते. महिनाभरात महाराष्ट्रात परदेशातून कांद्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यंदा नाफेडने अडीच लाख क्विंटल कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. नाफेडने लासलगाव बाजार समितीत १२०० रु क्विंटलच्या आसपास कांदा खरेदी केल्याने उत्पादकांमध्ये नाराजी आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा नाफेडने कांदा खरेदी करावे असे पत्र दिले आहे. मात्र नाफेडने २० ते २१ रुपये प्रति किलो दराने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला, तरच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

मार्च महिन्याच्या दरम्यान निघालेला उन्हाळ कांद्यातील जवळपास ७० ते ७५ टक्के कांदा शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवला आहे. गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या कांद्यातून२० ते २५ टक्के कांदा खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळातही कांदादरात सुधारणा झाली नाही तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल.



हेही वाचा

जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये वाढ, आता 'इतके' पैसे आकारणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा