Advertisement

मुंबईत 24 रुपये किलोने कांदा विकला जाणार

केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत फिरत्या वाहनांच्या विक्रीला हिरवा कंदील दिला आहे.

मुंबईत 24 रुपये किलोने कांदा विकला जाणार
SHARES

कांद्याचे भाव वाढत आहेत. ही महागाई पाहता, केंद्र सरकारने (Government) आता कांदे (onion) विकण्याची योजना सुरू केली आहे. याअंतर्गत, मुंबईच्या वेगवेगळ्या भागात फिरून ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत (price) कांदे उपलब्ध करून दिले जातील.

केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई (mumbai) आणि अहमदाबादमध्ये 24 रुपये प्रति किलो दराने कांदे विकण्याची योजना सुरू केली आहे. 'एनसीसीएफ', 'नाफेड' सारख्या सहकारी संस्था आणि या शहरांमधील केंद्रीय साठवणुकीद्वारे 'बफर स्टॉक'मधून सुमारे 25 टन कांदे विकले जातील.

केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत फिरत्या वाहनांच्या विक्रीला हिरवा कंदील दिला आहे. यासोबतच, इतर शहरांमध्येही अशाच प्रकारे कांदे विकले जातील. ही योजना गेल्या वर्षीही राबवण्यात आली होती.

'एनसीसीएफ'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उपक्रमाद्वारे दररोज सुमारे दहा टन कांदे विकले जातील अशी आशा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मुंबईत फिरत्या वाहनांद्वारे सवलतीच्या दरात कांदे विकले जातील.



हेही वाचा

वांद्रे येथे उच्च न्यायालयाचे नवे संकूल होणार

GST चे नवे दर लागू, काय स्वस्त? काय महाग?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा