ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्यांवर आता एफडीएची नजर

ऑनलाईन खाद्य पदार्थांची डिलवरी करणाऱ्यांना आता अन्न आणि औषध प्रशासन (एफडीआय) सोबत रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

SHARE

ऑनलाईन खाद्य पदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्यांना आता अन्न आणि औषध प्रशासनाकडं (एफडीआय) नोंदणी  करावी लागणार आहे. त्यामुळे ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्यांवर एफडीएची नजर राहणार आहे. 


शुल्क भरावं लागणार

नव्या नियमानुसार खाद्य पदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्यांना १ वर्षासाठी १०० रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तसंच, कोणत्याही ठिकाणी जाताना देण्यात आलेलं कार्ड आपल्या सोबत न्यावं लागणार आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून जेवण पोहोचवणाऱ्या कंपन्यांचा परवाना यापूर्वी एफडीएनं रद्द केला होता.


डॉक्टरांचं प्रमाणपत्र आवश्यक

डिलिव्हरी करणाऱ्यांना नोंदणीकृत डॉक्टरकडून फिट असल्याचं प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. तसंच, यामध्ये संबंधित व्यक्तीला कोणताही आजार नसल्याचं नमूद करावं लागणार आहे. एफडीए ही सर्व माहिती आपल्याकडं साठवून ठेवणार आहे.हेही वाचा -

लोकलच्या दरवाजात उभं राहणाऱ्यांविरोधात रेल्वेची विशेष मोहिम

भारताची अंतराळ 'शक्ती', ३ मिनिटांत पाडला उपग्रहसंबंधित विषय
ताज्या बातम्या