लोकलच्या दरवाजात उभं राहणाऱ्यांविरोधात रेल्वेची विशेष मोहिम

पश्चिम रेल्वे प्रशासनानं लोकलच्य दरवाजा उभं राहणाऱ्या प्रवाशांविरोधात एक विशेष मोहिम सुरू केली होती. या मोहिमेर्तंगत पश्चिम रेल्वेनं २४ मार्च २०१९ पर्यंत १००० पेक्षा अधिक प्रवाशांविरोधात कारवाई केली आहे.

लोकलच्या दरवाजात उभं राहणाऱ्यांविरोधात रेल्वेची विशेष मोहिम
SHARES

मुंबईत लोकलने प्रवास करताना दरवाजात उभं राहणाऱ्या प्रवाशांमुळं अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या अशा प्रवाशांविरोधात आता पश्चिम रेल्वेने एक विशेष मोहिम सुरू केली होती. या मोहिमेर्तंगत पश्चिम रेल्वेनं २४ मार्च २०१९ पर्यंत १००० पेक्षा अधिक प्रवाशांविरोधात कारवाई केली आहे.


दीड लाखांचा दंड

लोकलच्या दरवाजात उभं राहणाऱ्या प्रवाशांविरोधात अनेक तक्रारी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडं आल्या होत्या. या तक्रारी लक्षात घेत लोहमार्ग पोलिसांनी बोरीवली, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा आणि विरार स्थानकांवर एक विशेष मोहिम राबवली. त्यामध्ये पोलिसांनी लोकलच्या दरवाजावर उभं राहणाऱ्या एक हजार प्रवाशांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १.४७ लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली आहे.


ऑक्टोबरमध्येही कारवाई

याआधी ऑक्टोबर २०१८ मध्ये पश्चिम रेल्वेनं विशेष मोहीम आयोजीत केली होती. यावेळी लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या ९४ प्रवाशांविरोधात कारवाई केली होती. तसंच, मध्य रेल्वेनं डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांवर २९ प्रवशांविरोधात कारवाई केली होती. हेही वाचा -

आयकर विभागानं ५५ कोटींना विकल्या नीरव मोदीच्या पेंटिंग्ज

बेस्ट बसमध्ये पुन्हा होणार ट्रायमॅक्स मशीनचा वापरसंबंधित विषय