Advertisement

मुंबईमध्ये फक्त १९९३ रुग्णांना महात्मा फुले ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ


मुंबईमध्ये फक्त १९९३ रुग्णांना महात्मा फुले ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
SHARES

कोरोना संकटांचा सामना करण्यासाठी महात्मा फुले ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा राज्यातील सर्व नागरिकांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र प्रत्यक्षात फक्त ३० % लोकांनाच या योजनेचा फायदा झाला असल्याची धक्कादायकबाब माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून मिळाली आहे.

हेही वाचाः- राज ठाकरेंना कोर्टाकडून नोटीस, मनसे-अॅमेझॉन वाद चिघळला

१ डिसेंबर २०२० रोजी एकूण १८,२८,८२६ लाख लोकांना करोनाची लागत झाली होती त्यापैकी ९०,००० हे ऍक्टिव्ह केसेस होते, परंतु सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहितीचा अधिकार मार्फत मिळवलेल्या माहितीनुसार सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा फुले ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत फक्त ४४,४३१ रुग्णांना विम्याचा लाभ मिळाला आहे. १ एप्रिल २०२० पासून ते ३ डिसेंबर २०२० या ८ महिन्याच्या काळामध्ये एकूण ४४,४३१ केसेसचे ११०.७२ करोड मंजूर करण्यात आले आहेत. परंतु त्याच काळामधील मंजूर केसेस मध्ये फक्त ३० % टक्के म्हणजेच १४,७७२ केसेस मध्ये एकूण ३२.८३ करोड इतकी विम्याची रक्कम संबंधित रुग्ण्यालायला दिलेली आहे. तसेच ५५६५ कोविड रुग्णांना हा विमा नाकारण्यात आला आहे किंवा प्रलंबित ठेवला आहे.

हेही वाचाः- राज ठाकरेंना कोर्टाकडून नोटीस, मनसे-अॅमेझॉन वाद चिघळला

मागील काही काळात सरकारने बरेच मोठे दावे केले होते की या योजनांमध्ये लाखो कोविड-१९ रुग्णांना लाभ मिळाला आहे परंतु या माहितीवरून स्पष्ट दिसून येते की ही योजना जनते पर्यन्त पोहोचू शकलेली नाही आणि फक्त काहीच मूठभर लोकांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. आपण जर असे गृहीत धरलं की १८,२८,८२६ पैकी ३०% टक्के रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असावे तर फक्त ८% टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळाला असावा असा अंदाज लावू शकतो जिल्हा निहाय आकडेवारी अनुसार पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त लोकांना म्हणजेच ७,६३३ रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ४,१६६ तर सातारा जिल्ह्यात २,९४८ रुग्णांना या योजनेचा लाभ मिळालेला दिसून येते. परंतु मुंबईमध्ये फक्त १९९३ रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. सरकार मार्फत अशी घोषणा करण्यात आली होती की सगळ्या प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे परंतु या आकडे वारी अनुसार केशरी रंगाच्या रेशन कार्ड धारकांना म्हणजेच ३२,६६२ रुग्णांना याचा लाभ मिळाला तर ६,३६२ पिवळ्या रेशन कार्ड आणि ४,९५२ सफेद रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळालेला आहे.

हेही वाचाः- १ जानेवारीपासून सर्व वाहनांवर Fastag बंधनकारक, नितीन गडकरी यांची घोषणा

या माहितीचं संपूर्ण विश्लेषण केल्यास असे दिसून येते की ही योजना सगळ्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसून फक्त सरकारच्या नेटवर्क रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. बरेच रुग्णालय ही योजना राबवण्यात टाळाटाळ करत असून जेव्हा रुग्ण या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करतात तेव्हा त्यांना मदत केली जात नाही व रोख पैसे देऊनच उपचार करण्याचे सांगण्यात येते तसेच फक्त तीस टक्के विम्याची रक्कम रुग्णालयांना अदा केल्यामुळे या संपूर्ण योजनेची कार्यक्षमता मजबूत आणि सुरळीत करण्याची मोठी गरज दिसून येते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा