Advertisement

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी, अनेक भागांत साचलं पाणी

मुंबईसह उपनगरात सोमवारी सकाळीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पाससामुळं मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे.

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी, अनेक भागांत साचलं पाणी
SHARES

मुंबईसह उपनगरात सोमवारी सकाळीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पाससामुळं मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. मध्य रेल्वेच्या कांजुरमार्ग आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान रुळांवर पावसाचं पाणी तुंबलं आहे. त्याशिवाय सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचेही प्रचंड हाल होत आहेत.

वाहतूक कोंडी

जोरदार पावसामुळं मुंबईतील वांद्रे कलानगर, धारावी यांसह अनेक भागांत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हाय वे वरही दोन्हा मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना लेट मार्कचा सामना करावा लागणार आहे. तसंच, विमानसेवाही १५ मिनिटं उशिरानं सुरू आहे.

मोनो रेलमध्येही बिघाड 

पावसामुळं सोमवारी पुन्हा एकदा मोनोरेल सेवा विस्कळीत झाली आहे. मोनोरेलच्या चेंबूर स्थानकाजवळ मोनोरेल अडकली. चेंबूर स्थानकाजवळ मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मोनोरेल सेवा बंद पडली आहे. यापूर्वीही अनेकदा मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा ठप्प झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या.

सखल भागांत पाणी

मुंबईतील दादर, परळ, लालबाग, माटुंगा, सायन, कुर्ला, गांधी मार्केट (सायन), जोगेश्वरी, धारावी, माहिम याभागांतील सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.हेही वाचा -

मिलिंद देवरा यांनी दिला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

गोवंडी परिसरात इमारत कोसळली, ८ जण जखमीसंबंधित विषय