खांब धोकादायक स्थितीत

 Kandivali
खांब धोकादायक स्थितीत

कांदिवली - धोकादायक स्थितीत असलेल्या लोखंडी खांबामुळे कांदिवली पश्चिमेतील बजाज रोड येथून जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गाक्रमण करावे लागत आहे.

हा लोखंडी खांब केव्हाही कोसळेल, अशा धोकादायक स्थितीत आहे. सदर खांबाच्या मागे इलेक्ट्रिकल संच असून, त्याच्या बाजूला पान विक्रेत्याच दुकान आहे. तसेच खांबाजवळ कांदिवली महावीरनगरला जाण्यासाठी शेअरिंग रिक्षाच्या रांगा असतात. त्यामुळे हा खांब पडल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पालिका प्रशासनासाठी संपर्क साधला असता,"सदर खांब पाहून धोकादायक स्थितीत असल्यास काढण्यात येईल," असे आर दक्षिण पालिका विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी सांगितले.

Loading Comments