नायगावमध्ये मोफत वृत्तपत्र वाचनालय

 Dadar
नायगावमध्ये मोफत वृत्तपत्र वाचनालय

नायगाव - वाचन संस्कृती टिकून राहावी या उद्देशाने मोफत वृत्तपत्र वाचनालयाची सुविधा दादर (पू.) इथल्या नायगावच्या बीडीडी चाळ 21 मधील रहिवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. प्रिन्स स्पोर्टस् क्लबच्या वतीने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर वृत्तपत्र वाचनालय’ या नावाने वाचनालय उभारण्यात आले. 

याचे उद्घाटन शनिवारी भोईवाडा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वडाळा विधानसभेचे भाजपाचे महामंत्री गजेंद्र धुमाळे, प्रिन्स स्पोर्टस् क्लबचे सल्लागार आनंद कांबळे, सुनिल कदम तसेच विभागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading Comments