लोंबकळत्या केबलतारांमुळे दुचाकीस्वार त्रस्त

 Mumbai
लोंबकळत्या केबलतारांमुळे दुचाकीस्वार त्रस्त

करी रोड - भारतमाताच्या लालबाग पुलावरून लोंबकळणार्‍या केबल तारांमुळे दुचाकीस्वारांना धोका निर्माण झाला आहे. या तारांमध्ये अडकून बाइकस्वारांचा अपघात होण्याची शकता निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती असूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. ही केबल पुलाखालील मार्गावर गेले दोन दिवस लोंबकळत आहे. मात्र मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न संतप्त स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. या तारांमुळे अनेक अपघात होत आहेत. याचा नाहक त्रास दुचाकीस्वरांना करावा लागत आहे. यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. सध्या स्थानिकांनी ही केबल-तार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबाला बांधून ठेवली आहे. त्यामुळे तात्पुरती तरी अपघात होण्याची शक्यता टळली आहे.

Loading Comments